एखादी गोष्ट आपल्या मनाला भिडते, म्हणजे काय?
एकतर त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या असतात किंवा त्या गोष्टीत आपण स्वत:ला पाहतो. आणि ज्यावेळी एखादयाची दु:ख मनाला भिडतात त्यावेळी तुमच्यातला माणूस जागा असतो....
बघा काहि अनूभवता येत का ते!!!
- मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा
वाळक पान सुध्दा गळताना तन्मयतेने पहणारा - माझ्या हसण्यावर जाऊ नका,
माझ्या रूसण्यावर जाऊ नका,
जरी तुमच्यात बसलो तरी,
माझ्या असण्यावर जाऊ नका. - तळ्याकाठच गवत, तळ्याशी सलगीन वागायच.
कारण त्याला जगायला, तळ्याच पाणी लागायच. - कालच एका पाखराला, त्याच घरट शोधत भरकटताना पाहील.
कस सांगु त्याला त्याच घरट ओरबाडून पाडताना मी पाहील. - सगळीच गावं दूरून सुबक सुंदर दिसतात
गल्लीतून फिरताना कळत ती विस्कटलेली असतात. - घराभोवती कुंपण हव, म्हणजे आपल जग ठरवता येत
बाहेर बरबटलेल असल तरी, आपल्यापुरत सरवता येत. - जन्मभर जळल्यावर, मेल्यावर पण जाळतात.
लाकडांपेक्षा माणसच लाकडांचे गुणधर्म पाळतात